बाप
आई घराच मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो.पण घराच्या या अस्तित्वाला
खरच आम्ही समजून घेतलेलं आहे का ? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त
लिहीलं जात नाही,बोलल जात नाही.कोणताही व्याख्याता आई विषयी बोलत राहतो.संत
महात्म्यांनी आईचचं महत्व अधिक सांगितलेल आहे.देवादेविकांचे आईचे गोडवे गायले आहेत.
लेखकांनी,कवींनी आईचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.चांगल्या गोष्टिंना आईचीच उपमा दिली
जाते.पण बापाच्या विषयी कुठच फ़ारसं बोलल जात नाही.काही लोकांनी बाप रेखाटला पण
तोही तापट,व्यसनी,मारझोड करणारा.समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही.पण
चांगल्या वडिलांबद्दल काय ?
आईकडं अश्रूंचे पाट असतात पण बापाकडं संयमाचे घाट असतात.आई रडून मोकळी होते,
पण सांत्वन वडलांना करावं लागतं आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणारयावरच जास्त ताण
पडतो.कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापतेना पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं.
रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते.पण आयुष्याच्या शिदोरीची सोय
करणारा बाप आम्ही किती सहज विसरुन जातो.सर्वांसमोर आई मोकळेपणाणे रडू शकते.पण
रात्री उशीत तोंडखुपसून मुसमुसतो तो बाप असतो.आई रडते, वडलांना रडता येत नाही.
स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही.कारण छोटया भावंडांना जपायच असतं.
आई गेली तरीही रडता येत नाही.कारण बहीणींचा आधार व्हायच असतं पत्नी अर्ध्यावर साथ
सोडून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.
जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं,पण शहाजीं राजांची
ओढाताण सुद्धा लक्षात घ्यावी.देवकीचं,यशोधेच कौतुक अवश्य करावं पुरातुन पोराला
डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा.राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण
पुत्र वियोगाने तडफ़डून मरण पावला तो पिता दशरथ होता.वडिलांच्या टाचा झिजलेल्या
चपलांकडे बघितल की त्याच प्रेम कळंत त्याची फाटकी बघितल की कळतं,”आमच्या
नशिबाची भोकं त्यांच्या बनियानला पडतील.त्यांची दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर
दाखवितो.
मुलीला गाऊन घेतील.मुलाला लुंगी घेतील पण स्वःता मात्र जुनी प्यन्ट वापरायला
काढतील.मुलगा सलून मध्ये वीस रुपये खर्च करतो.मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तीसेक
रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी
खरडत असतो.अनेकदा तो नुसत पाणी लावून दाढी करतो.बाप आजारी पडला तरी पटकन
दवाखान्यात जात नाही.तो आजाराला मुळीच घाबरत नाही.पण डॉक्टर एखादा महिना आराम
करायला लावतील याची त्याला भीती वाटते.कारण पोरीच लग्न,पोराच क्षिक्षण बाकी असतं
घरात उत्पन्नाचं दुसरं साधनं ऎपत नसते तरिही मुलाला मेडिकलला,इंजिनीयरींगला प्रवेश
मिळवून दिला जातो.ओढाताण सहन करून त्या मुलाला दरमहिन्याला पैसे पाठविले जातात.पण
सर्वच नसली तरी काही मुल अशीही असतात की जे तारखेलाच पैसे येतात मित्रांना परमिट रूममध्ये
पार्टया देतात आणि ज्या बापानी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात.एकमेकांच्या
बापाच्या नावांनी एकमेकांना हाका मारतात.
आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असते ज्या घरात बाप आहे त्या
घराकडे कोणी वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही.कारण घरातला कर्ता जिवंत असतो.
जो घरी काहीही करत नसला तरी तो त्या पदावर असतो.आणि घराच्याचं कर्म बघत असतो.
सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येणार नाही.पण बाप होणं टाळता येतं पण बाप
कधीच बाप होण्याचं टाळत नाही.आईच्या आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळे
अर्थ असतो.
कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आइ जवळची वाटते कारण ती जवळ घेते.
कवटाळते,कौतुक करते.पण गुपचुप जावून पेढयांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात
रहात नाही.पहिलटकरणीचं खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे
वावरणारया त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही.
चटका बसला,ठेच लागली,फ़टका बसला तर आईगं हा शब्द बाहेर पडतो.पण
हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्रक जवळ येवून ब्रेक अचानक लावतो तेव्हा “बाप रे” हाच
शब्द बाहेर पडतो.कारण छोटया संकटांसाठी चालेल पण मोठमोठी वादळं पेलताना बापच
आठवतो……काय पटतयं ना ?
कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात.पण मयताच्या प्रसंगी बापालाच
जावं लागतं कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो.पण गरीब लेकीच्या घरी
उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो.तरुण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही,तर
बापच जागा असतो.मुलाच्या नोकरीसाठी साहेबपुढं लाचार होणारा बाप,मुलीच्या स्थळासाठी
उंबरठे झिजवणारा बाप,घरच्यांसाठी स्वःताच्या व्यथा दडपणारा बाप…..खरच किती ग्रेट
असतो ना ?
वडिलांच महत्व कोणाला कळतं ?……लहाणपणीच वडील गेल्यावर अनेक
जबाबदार्या खूप लवकर पेलाव्या लागतात.त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं.वडिलांना
खरया अर्थाने समजून घेते ती म्हणजे घरातली मुलगी.सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर
असलेल्या मुलीला बापाशी फ़ोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो.
मग ती अनेक प्रश्न विचारते.कोणतीही मुलगी स्वःताच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा
विवाहाच्या बोहल्यावर चढते.मुलगी बापाला जाणते.जपते इतरांनी सुद्धा असंच आपल्याला
जाणावं हीच बापाची किमान अपेक्षा असते.